Agricultural business ideas is the key of rural development
कृषी व्यवसाय कल्पना ही ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली आहे.
शेतीउद्योग हा पूर्णतः निसर्गावरच अवलंबून असून अलीकडील काळात वातावरणात होणारे सतत चे बदल, आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल होतानाचे चित्र आपण सर्वत्र पाहत आहोत आणि त्यातली त्यात सततच्या बदलत्या चुकीच्या सरकारी धोरणांमुळे आणि अखंडित न मिळणाऱ्या विजेमुळे हाताला आलेले पिक शेतकर्यांना गमवायला लागते शेतीतील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतीत काम न करायच्या मानसिकते मुळे मजुरांची संख्या कमी होऊन वेळेला मजूर न उपलब्धते मुळे हाताला आलेली पिके बऱ्याचदा वेळेवर न काढल्यामुळे वाया गेलेली आपण सर्वत्र ऐकतो आणि यातूनच दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले आहे, एवढे करूनही जर पूर्ण वर्षाचा एखाद्या पिकाचा तालळेबंध लावला तर पूर्ण वेळ शेती करणाऱ्या किती शेतकर्यांना शेती परवडते हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे म्हणूनच आजकाल ची तरुण पिढी हि शेतीला काहीतरी जोडधंदा असावा म्हणून शेती पूरक व्यवसायांकडे Agricultural business ideas वळत आहे आणि ती काळाची गरजपण आहे.👉शेतीपूरक व्यवसायांमध्ये काय काय करावे
प्रथमतः बऱ्याच लोकांना शेतीपूरक व्यवसायांमध्ये Agricultural business ideas काय काय करावे आणि कसे करावे याबद्दल अजिबात माहिती नसते किवा या मध्ये आपण काय काय करु शकतो हे हि माहित नसते शेतीपूरक व्यवसायामध्ये काही वेगळे करायचे असते असे काही नाही पण शेतीपूरक व्यसायामध्ये आपण असे काही करू शकता कि त्यामुळे तुम्हाला पैसा आणि प्रतिष्टा ह्या दोन्हीही गोष्टी मिळू शकतात ज्या कि तुम्ही करत असलेल्या शेतीमधून क्वचितच मिळू शकाल.शेतीपूरक व्यवसायामध्ये आपण खूप काही व्यवसाय करू शकतो या मध्ये जसे कि गायी म्हशी पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन. आणि खूप काही हे आपण आपल्याच घरात लहानपणीपासून पाहत आलेले असतो पण ते कमी प्रमाणात आणि वडील आजोबा यांच्यापासून केलेले पारंपारिक पद्धतीने असते पण त्यामध्ये १-५ या प्रमाणात किवा थोडे कमी अधिक प्रमाणात केलेले असते पण त्याचा उद्देश हा फक्त घरगुती वापरासाठीच हा उपयोग असतो आणि तो कधीही वाढत नाही किवा त्याकडे कधी व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात नाही कारण आपला एक असा समाज असतो की यातून घरच्या गरजा भागल्या कि आपण खुश होतो पण आता अशे नाही वाढते शहरीकरण आणि वाढत्या गरजा भागवण्यासाठी दिवसेंदिवस लागणाऱ्या गोष्टींची चणचण भासत असून त्यातूनच शेतीपूरक व्यवसायांवर शहरानजिक मोठे मोठे उधोग उभे राहत आहेत आणि ते आता ग्रामीण भागात हि पोहचत आहेत आणि यावरून ग्रामीण भागातील शेतकर्यांना नक्कीच चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत आणि भविष्यात आणखी वाढती मागणी पाहता शेतीपूरक व्यवसायांना सोन्याचे दिवस नक्कीच येणार याची खात्री आहे
👉 शेतीपूरक व्यवसाय Agricultural business करताना खूप अडचणी आहेत:-
सर्वप्रथम आपण शेतीपूरक व्यवसायांकडे पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजेन परंतु आजपर्यंत अजूनही आपल्याकडील समाज व्यवस्थेमध्ये वयाला महत्व आहे अनुभवला आणि शिक्षणाला काहीही किमत दिली जात नाही आणि हीच तर सर्वात मोठी महत्वाची बाब शेतीपूरक व्यवसायाला ग्रामीण भागात सतत आडवी येणारी आहे आजकाल ग्रामीण भागात एखाद्या तरुणाने काही वेगळ्या पद्धतीने शेतीमध्ये किवा शेतीपूरक व्यवसायामध्ये बदल करायचा निर्णय घ्यायचा ठरवला तर त्याला शंभर लोक आडवे येणार {या आडव्या येणार्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनात कधीही त्या वाटेवर जाण्याचाही साधा विचार केलेला नसतो परंतु त्याचे वयानुसार सल्ले चालू होतात} आमुक याने केले होते त्याचे तमुक झाले तू काय असे वेगळे करणार आहेस तू काय वेगळा लागून गेलास, याकडे एवढे पैसे होते त्याला नाही करता आले, त्याकडे तेवढे होते तो डूबला आपण तर त्यांच्यापुढे काहीच नाही. आपली एखादी नौकरी करावी ज्याने कि महिन्याला पगार मिळेल हे आणि असे अनेक प्रश असतात आणि यामुळेही भारत मंगळावर पोहचला असला तरी ग्रामीण भागातील बरेच लोक त्यातून बाहेर यायला तयार नाहीत त्यामुळेच आपल्याकडे ग्रामीण भागात अशी परस्थिती आहे कि जर १०० मधील ९0 तरुण काही व्यवसाय करण्याचे धाडस करत नाहीत आणि त्या लोकांनी जरी व्यवसाय केला तरी ते तेवढ्या ताकतीने पुढे जात नाहीत कारण त्यांना अगोदरच पूर्ण खचून टाकले जाते आणि जि उरलेली १० टक्के तरुण आहेत कि ज्यांनी ठरवलेले असते की आपण काहीतरी करून दाखवायचे आणि ते करूनही दाखवतात आणि तीच १० टक्के लोक पुढे या व्यवसायात प्रतिनिधित्व करतात आणि नावारूपाला येतात.अजूनही आपल्या भागात पारंपारिकतेला खूप महत्व आहे पारंपारिकतेला सोडून काहीतरी आधुनिक प्रयोग शेतात करायला लोणीही तयार नाही त्याची बरीच कारणे आहेत त्यात काहीना असे वाटते कि खर्च खूप लागतो किवा त्यांनि या गोष्टी कधी पाहिलेल्याही नसतात किवा त्यावर विचारही केलेला नसतो व सर्वात महत्वाचा धोका त्यांच्या मनात एकाच असतो कि आपण जे चालू करू त्यात जर अपयश आले तर पुढे काय आणि सर्वात मोठा विचार एकाच असतो कि ‘लोक काय म्हणतील’ या एका विचाराणे ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांना काही सुरवात करण्या अगोदरच संपून टाकतो. बऱ्याच लोकांची सुरवातच पुढे हे होईल कि नाही यापासून झालेली असते ते पुढे कधीही वेगळ्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत नाहीत आणि मग वर्षोन वर्षे उमेदीच्या काळात नौकरी शोधण्याच्या मागे पाळतात आणि शेवटी बराच काल निघून जातो आणि मग काहीच नाही म्हणून काहीतरी कारावे लागते आणि उम्मेदीचा काळ संपल्यावर शेती करायला उतरतात आणि मग तेवढया ताकतीने शेती होत नाही आणि मग शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला Agricultural business नावे ठेवली जातात हि आपल्याकडील शोकांतिका आहे.
अजून हि काही ग्रामीण भागात शेळीपालन, कोंबडी पालन या व्यवसायाला बरीच लोक दुय्यम दर्ज्या देतात हि खूप घाणेरडी मानशीकता आपल्याकडे पाहायला मिळते कुणी विचार जरी बोलून दाखवला कि मी कुक्कुटपालन करायचा विचार करतोय तर लगेच समोरचा बोलणार दुसरा काहीच उदयोग नाही राहिला का असे बोलून लगेच नाक मुरडायला लागतात.
सरकारी योजनेची माहिती https://mangalagrofarms.blogspot.com/2023/06/%20%20%20%20%20PM-Kisan-Samman-Nidhi-Yojana.html
बऱ्याचदा ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायाला Agricultural business विरोध हा प्रथम सुरु होतो तो हि आपल्या स्वतःच्या घरातूनच आणि मग तो वाढत जाऊन गावभर फोह्चतो पण असे न होता जर घरच्या मंडळीनी समजावून घेऊन सहकार्य केले तर नक्कीच शेतीपूरक व्यवसाय हा खूप मोठा होऊ शकतो आणि तसे उदाहरण पण आहेत पण जास्त उदा हे विरोध पत्करून मोठे झालेली खूप लोक आपणास पाहवयास मिळतील आणि ज्यांना विरोध होतो अश्या लोकांनी नक्क्कीच विरोधातून काहीतरी करून दाखवले आहे त्यांचा आदर्श जरूर घ्यावादुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी माणसाची मांनशिकता अशी आहे कि एक लाख रुपये टाकले कि दुसऱ्या दिवसा पासूनच मोठ्या प्रमाणात उत्पन्न चालू व्हावे पण तसे होत नाही किवा होऊही शकत नाही कारण कुठल्याही व्यवसाय हा एक उंची गाठायला किमान एक ते दोन वर्ष तरी वेळ लागतात आणि यातच जवळपास ९० टक्के मराठी माणसांचे व्यवसाय बंद होतात याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे आपली शेतकरी माल तयार करू शकतात पण विकण्यासाठी त्यावर काहीतरी वेळ द्यावा हा विचार अजूनही आपल्याकडे रुजलेला नाही मी माझ्या लहानपणापासून हि गोष्ट पाहत आलो आहे कि आज माल झाला कि कुठल्याही बाजारभावाची चौकशी न करता तो लगेच येणाऱ्या आठवडे बाजारात विकायला जाई आणि त्याला दरवर्षीप्रमाणे ठरल्या प्रमाणे कमी भावातच विकला जाई तरीहि कुठल्याही व्यवसायात वेळ देणे खूप महत्वाचे आहे आणि जोपर्यंत शेतकर्यांना वेळ कळणार नाही तोपर्यंत चांगले दिवस येणे कठीणच आहे तरीही आपण लगेच कुठल्याही व्यवसायात नफा मिळेल अशी अपेक्श्या न करता हळूहळू त्या व्यवसायातून कमवायला शिकलात तर नक्कीच एक दिवस मराठी माणूस हा उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही
👉"मंगल
अग्रो फार्म" Mangal Agro Farms या ब्लॉग वर
आपणा सर्वाना सर्व शेतीपूरक व्यवसाय जसे
कि कृषीपुरक
उद्योग,शेतीविषयक माहिती,सरकारी योजना,पशुधन,खरेदी विक्री,बाजारभाव,बियाणे,खते आणि अवजारे,फळे आणि भाजीपाला,सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती आणि खानपान,फोटो आणि व्हिडीओ आणि इतरही व्यवसायासंबधीची शास्रशुद्ध माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न
आम्ही इथे करत आहोत
शेतीपूरक
व्यवसायामध्ये शेतकर्यांनी क्रांती करून आपले जीवनमान सुधारावे यासाठीच हे
उचललेले छोटेसे पाउल आहे.
ब्लॉग पाहून लाईक Share करावयाचे आहे.अधिक माहितीसाठी आमच्या खालील लिंक ला भेट द्या
ब्लॉग पाहून लाईक Share करावयाचे आहे.अधिक माहितीसाठी आमच्या खालील लिंक ला भेट द्या
👇
सुरेश गुलगे
मंगल अँग्रो फार्म
मंगल अँग्रो फार्म
0 टिप्पणियाँ